प्रत्येक फोटोमागे कष्ट असतं..© शादाब शेख

 











प्रत्येक फोटोमागे कष्ट असतं.. 

त्या-त्या वेळेनुसार तिथं पोहोचला की झालं.. हवं ते मिळतं.


     तीन वर्षा पूर्वी असच पहाटे फिरताना छत्रपती शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याची एक फ्रेम नजरेत होती. एका बाजूने महाराजांचा पुतळा, पुतळ्यामागे लाईट, आणि दाट धुकं.. ह्या शोधात होतो. पण आजूबाजूला बोर्ड आणि जाहिराती असल्यामुळे फ्रेम हवी तशी दिसत न्हवती, मिळत न्हवती..

     मागच्या दोन वर्षात थंडीची सुरवात होताच मी भल्या पहाटे घरातून बाहेर पडून शिवाजी चौकात जायचो.. पण फ्रेम काही मनासारखी मिळत नसल्याने पुन्हा माघारी यावं लागत असे.

     या वर्षी फोटो काढायचंच असं नियोजन होतं.. पण दाट धुकं जरी पडलं तरी क्षणात ते गायब ही होतं, त्यामुळे या वर्षीही दोन वेळा संधी हुकलेली.. काल अर्ध्या रात्री दोन वाजता अचानक जाग आली.. बाहेर बघतो तर समोरचं काहीच दिसत न्हवतं.. इतकं दाट धुकं होतं. घाईघाईने आवरून घरातुन बाहेर पडलो.. ते सरळ शिवाजी चौक गाठला. जे हवं होतं, जी फ्रेम तीन वर्षांपासून डोक्यात होती ती समोर माझ्यासाठीच जणू तयार झालेली आहे असं वाटत होतं.. मोबाईल काढून, एकच हवा तो फोटो घेऊन.. मस्त त्या थंडीत, दाट धुक्यातुन वाट काढत.. गंगावेश जवळ असलेल्या टपरीवर गवती चहा घेऊन घरी आलो..


     शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच पुतळ्या खाली अफझलखान वधाची फ्रेम, मागे डांबावरची लाईट, आणि धुकं.. ह्या सगळ्या गोष्टी एकाच फ्रेम मधे कैद केल्या.. वरती मार्केट मधे खोलीत सुरू असलेली ट्यूब लाईट.. ह्या सगळ्या गोष्टी त्या फ्रेमला बॅलन्स करत होत्या. शेवटी जे हवं ते मिळाल्याचा आनंद होताच..📸


फोटो : सॅमसंग मोबाईल S20 FE


© शादाब शेख 


#amhikolhapuri #आम्ही_कोल्हापुरी #फोटोग्राफी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणता नवरा खरेदी करू...?

WSF Team Adoni (AP) Helped Rs.5,45,000/- to needy families

लग्नाचा समारंभ कसा असावा ह्या अटींसाठी समाजाला आवाहन