मते--मतांतरे

 






🙏!!मते--मतांतरे------👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨🙏🙏🙏🙏🙏🙏

 मधल्या काळात मी आपल्या समाजात होणाऱ्या वधू वर परिचय मेळाव्या बाबत आपले स्पष्ट विचार व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व्यक्त केले होते.

🙏 बऱ्याच समाज बांधवांनी त्यावर आपली वेगवेगळी मते आणि विचार प्रकट केले होते.

🌷 सर्वांच्या विचाराचा एकच समान धागा दिसून आला---आणि तो म्हणजे वर वधू परिचय मेळाव्याच्या दिवशी मुला-- मुलींनी प्रत्यक्ष व्यासपीठावर येऊन आपला परिचय देणे,---आणि हे जर निदान 50% जरी शक्य झाले तरी तो मेळावा यशस्वी झाला असे समजता येईल.

🙏 सोबतच, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुला-- मुलींसाठी, छोटे मोठे व्यवसाय तसेच उद्योग करण्यासाठी सुद्धा स्वतंत्रपणे परिचय मेळावे घेण्याबाबत सुद्धा सूचना प्राप्त झाली होती.🙏 काही समाज बांधवांनी---परिचय मेळावे हे संघटनेच्या माध्यमातूनच आयोजित करावे--जेणेकरून अशा मेळाव्यास लौकिक प्राप्त होईल, आणि परिचय मेळाव्याच्या प्रसंगी पुरस्कार किंवा भाषणबाजी न करता फक्त औपचारिक उद्घाटन करून पूर्ण वेळ सहभागी मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना व्यासपीठावर संधी द्यावी असेही विचार काही समाज बांधवांनी व्यक्त केले.

🙏 खरंच, खूप चांगले विचार समाज बांधवांनी व्यक्त केले. परंतु, दुर्दैवाने---आपल्या समाजामध्ये व्यक्तिगतरीत्या जे समाज बांधव परिचय मेळावे आयोजित करतात त्या मेळाव्यास वरील विचाराप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही.

🙏 पुण्यातील अपवाद सोडता इतर ठिकाणी जे मेळावे होतात त्या ठिकाणी---विशेषता, व्यक्तिगतरीत्या जे मेळावे आयोजित करतात तेथील परिस्थिती पाहता---खूप निराशा जनक चित्र दिसून येते.

🙏 काही ठिकाणी----परिचय मेळाव्याच्या नावाखाली फक्त पुरस्कार वितरण करण्यातच धन्यता मानल्या जाते. दुर्दैवाने समाजातील काही मान्यवर आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी अशा कार्यक्रमाचे आंधळेपणाने समर्थनही करीत असल्याचे दिसून येते.

🙏 काही पुरस्कार पैसे देऊन किंवा घेऊन दिल्या जातात की काय ?? अशी शंका सुद्धा बऱ्याच समाज बांधवांच्या मनामध्ये येत असते. फक्त शंका व्यक्त करीत नाहीत तर जाहीरपणे त्याचा उल्लेख करून परिचय मेळाव्याच्या नावावर पुरस्काराचा बाजार मांडला की काय ? असे बोलण्यास सुज्ञ समाज बांधव मागेपुढे पाहत नाही.


🙏 परिचय मेळाव्यामध्ये पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास दोन-तीन तास लावायचे आणि प्रत्यक्ष परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमास प्रतिसाद नसल्यामुळे फक्त एक तास लावायचा हे चित्र भयावह आहे.

🙏 मुला-- मुलींचे पालक मोठ्या अपेक्षेने शुल्क भरून आपली नोंदणी करीत असतात---परंतु प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाचे चित्र पाहून प्रचंड निराश होतात.

🙏 वास्तविक, आयोजकांनी याबाबत अतिशय काळजी घेणे आवश्यक असते. परंतु कुठेतरी आपला मोठेपणा दिसावा---आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे हे दाखविण्याचा अट्टाहास मूळ कार्यक्रमाच्या उद्देशाला तडा देतो.

🙏🙏 कुठेतरी, वरील सर्व घटना आणि प्रकार थांबविल्याशिवाय समाज बांधवांचा परिचय मेळाव्यावर विश्वास बसणार नाही. अन्यथा फक्त पैसे जमा जमा करा, जमलेल्या पैशावर आपल्या मर्जीतल्या लोकांना पुरस्कार द्या आणि आपला मोठेपणा करून घ्या हे दिसून येईल. याबाबत, पुणे येथील देवांग समाजाचे खरंच कौतुक करायला हवे.


🙏 प्रचंड प्रतिसाद, शिस्तबद्ध कार्यक्रम,भोजनाची उत्तम व्यवस्था इत्यादी बाबी पुणे येथे दिसून येतात.


🙏 यापुढे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या समाज बांधवांसाठी तसेच व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्रपणे परिचय मेळावे घेतल्यास समाजातील एका वर्गास दिलासा मिळेल. आणि व्यक्तिगतरीत्या जे समाज बांधव मेळावे घेतात त्यांनी वरील प्रकारे दुरुस्ती करून समाज बांधवांचा विश्वास संपादन करावा.

🙏 सदर माझे विचार हे व्यक्तिगत स्वरूपाचे असून कोणाचाही अपमान किंवा मन दुखवण्याचा माझा उद्देश नाही, परंतु तरीही माझ्या या पोस्टमुळे कोणाचे मन किंवा भावना


🙏 दुखावल्या असतील तर क्षमा असावी.

🙏आपला विश्वासू

*नरेंद्र माहुरे* प्रमुख संघटक,


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 आमच्या व्हाट्सअप  ग्रुपला जॉईन व्हा 👇👇👇

https://chat.whatsapp.com/DrloGgvEItZDu7WPndhgbr

 📲Share all educational group📲📲📲📲📲


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणता नवरा खरेदी करू...?

WSF Team Adoni (AP) Helped Rs.5,45,000/- to needy families

लग्नाचा समारंभ कसा असावा ह्या अटींसाठी समाजाला आवाहन